अधर्मी राजकारण्यांना त्यांनी केलेल्या पापकर्मांची फळे भोगावीच लागतात !

पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार

पू. तनुजा ठाकूर

‘पापी, देशद्रोही, भ्रष्ट आणि येनकेन प्रकारेण सत्ता मिळवणार्‍यांना काय परिणाम भोगावे लागतात, याविषयी महात्मा विदुरजींचा पुढील श्लोक वाचनीय आहे.

एकः पापानि कुरुते फलं भुङ्क्ते महाजनः ।
भोक्तारो विप्रमुच्यन्ते कर्ता दोषेण लिप्यते ।।

– विदुरनीति, अध्याय १, श्लोक ४७

अर्थ : एखादा मनुष्य पापकर्मे करतो आणि अनेक लोक त्याच्या तात्कालिक फळाचा (सुखाचा) उपभोग घेतात. नंतर उपभोग घेणारे दोषांपासून (कर्मफलांपासून) मुक्त होतात; मात्र पाप करणार्‍याला त्या पापाची शिक्षा भोगावी लागते.

पापकर्म करणार्‍याला दीर्घकाळापर्यंत देशद्रोही म्हणून कुप्रसिद्धी मिळते. मूर्ख, अधर्मी आणि दुष्कर्मी राजकारणी विचार करतात की, ते कपट, बळ आणि पैसे यांच्या माध्यमातून त्यांच्या पापांच्या शिक्षेपासून वाचतील; परंतु तसे नाही. या सृष्टीच्या कर्मफलन्यायाच्या सिद्धांतानुसार, पापी माणसाला त्याच्या दुष्कर्मांची फळे भोगावीच लागतात. जर एखाद्याने समष्टी पाप केले, तर त्याला व्यष्टी पाप करणार्‍यापेक्षा अधिक कठोर शिक्षा या लोकात आणि परलोकात दोन्हीकडे भोगावी लागते; म्हणून नेतृत्व करणार्‍यांनी नेहमीच सर्व कर्मे धर्माला अनुसरून (धर्माधिष्ठित) करायला हवीत.’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ (२०.११.२०२१)