‘हलाल’ चालू झाल्यापासून ‘हलाल’ला झटका द्यायला हवा, हे सरकारला का कळले नाही ?

‘भारतामध्ये सध्या ‘हलाल मांसा’ची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. केवळ मांसच नव्हे, तर खाण्या-पिण्याच्या अन्य साहित्यासाठीही हलाल प्रमाणपत्र घेतले जाते. तत्कालीन काँग्रेस सरकारने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हलाल प्रमाणपत्राला मान्यता दिली. त्यानंतरच हलालचे प्रस्थ देशात वाढीस लागले. देशांतर्गत अनेक ठिकाणी हलाल प्रमाणपत्र असलेल्या साहित्याची विक्री केली जाते. हलाल मांस म्हणजे प्राण्यांचे तोंड मक्केच्या दिशेला करून त्यांच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्यांना तडफडत मरू दिले जाते. त्यामुळे प्राण्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात वहाते. याउलट हिंदु किंवा शीख धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्यांची हत्या केली जाते. त्यात प्राण्यांची मान एकाच घावात कापली जात असल्याने त्यांना अल्प प्रमाणात त्रास होतो.’