नाशिक – जिल्ह्यात पिंपळगाव बसवंतसह अन्यत्र कांदा व्यापार्यांची घरे, कार्यालये आणि गोदामे आदी २० ठिकाणी प्राप्तीकर विभागाने २१ ऑक्टोबर या दिवशी धाडी टाकल्या. प्राप्तीकर विभागाच्या २० पथकांनी ही मोहीम राबवली असून यात नाशिकसह संभाजीनगर आणि पुणे येथील १०० हून अधिकारी अन् कर्मचारी यांचा समावेश होता.