रोख ३६ सहस्र रुपये आणि बनावट दागिने यांचीही चोरी !

संभाजीनगर – जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडोळी भागातील शेतवस्तीमध्ये ३ मासांपासून मध्यप्रदेशातील एक कुटुंब रहाण्यास आले होते. यात ३ पुरुष आणि ४ महिला आहेत. १९ ऑक्टोबरच्या रात्री ७-८ दरोडेखोरांनी या शेतवस्तीवर आक्रमण केले. दरोडेखोरांनी तेथील पुरुषांचे हात-पाय बांधून ठेवत २ महिलांवर बलात्कार केला. तत्पूर्वी दरोडेखोरांनी लोहगावच्या एका शेतवस्तीवर आक्रमण करून तेथील रक्कम लुटली असून तेथील पुरुषांनाही मारहाण केली होती. या घटनेत दरोडेखोरांनी रोख ३६ सहस्र रुपये आणि बनावट दागिने पळवून नेले. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची ११ पथके रवाना झाली आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !