|
ठाणे – घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट परिसरात नुकतेच नारळ विकणार्या एका फेरीवाल्याने ठाणे महानगरपालिकेच्या पथकावर चाकूने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. फेरीवाल्याने ‘आधी बोटे छाटली होती, आता मानच छाटू’, अशी धमकी दिली. पथकातील कर्मचार्यांनी धाडस दाखवल्यामुळे हा फेरीवाला नरमल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
येथील महानगरपालिकेच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने आक्रमण केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने फेरीवाल्यांच्या विरोधात धडक कारवाई केली; मात्र तरीही फेरीवाल्यांचा उद्दामपणा तसाच आहे.
आक्रमणे टाळण्यासाठी ‘फेरीवाला धोरण’ राबवणे आवश्यक ! – मनोहर डुंबरे, भाजप गटनेते, ठाणे महानगरपालिका
घोडबंदर भागात फेरीवाल्यांकडून चाकूने आक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्याचे समजले. याविषयी सर्वसाधारण सभेत विचारणाही केली; मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही, असे प्रकार टाळण्यासाठी ‘फेरीवाला धोरण’ लवकर राबवणे आवश्यक आहे, असे महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी सांगितले.