बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाविषयी नंदुरबारच्या निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन !

निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

नंदुरबार – बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरावर आक्रमण करणार्‍या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांड घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंतप्रधानांना प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन देऊन करण्यात आली. नंदुरबारचे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना २० ऑक्टोबर या दिवशी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी ‘इस्कॉन’चे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख श्रीमान माधवशाम सुंदर दास, श्रीमान भद्रसेन दास, निखिल खलाने, धर्मप्रेमी धीरज चौधरी, जितेंद्र मराठे, हिंदु जनजागृती समितीचे प्रा.डॉ. सतीश बागुल आणि राहुल मराठे उपस्थित होते.