कोल्हापूर, १३ ऑक्टोबर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले काही मास महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात (कर्नाटक) प्रवेश करतांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. १४ ऑक्टोबरपासून ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. लवकरच सीमाभागात कोगनोळी नाक्याजवळ लावण्यात आलेले ‘बॅरिकेड्स’ काढून टाकण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी रस्ते खुले होणार आहेत.