हेडगेवार हायस्कूलचे विद्यार्थी आणि पालक यांची प्रत्यक्ष परीक्षा आणि वर्ग चालू करण्याची मागणी !

पणजी येथील आझाद मैदानात मोर्चा

हेडगेवार हायस्कूल

पणजी, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि प्रत्यक्ष (ऑफलाईन ) वर्ग चालू करण्यात यावेत, अशी मागणी करत पणजी येथील हेडगेवार हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी आझाद मैदानात मोर्चा काढला. या सर्वांचे म्हणणे होते की, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि प्रत्यक्ष वर्ग चालू करण्याविषयी त्यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याविषयीचे निवेदन दिले आहे. (अशी मागणी का करावी लागते ? शासनाने स्वतःहून असे निर्णय घेतले पाहिजेत ! – संपादक)