परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

१४ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (आठवा दिवस)

जिच्या विना संपूर्ण जग मूक आणि विवेकशून्य होऊन जाईल, त्या वाणीच्या अधिष्ठात्री असणार्‍या देवी सरस्वतीला नमस्कार असो.

निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांना चालना मिळण्यासाठी अमित शहा यांची गोवा भेट महत्त्वाची ! – देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबरला गोव्यात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गोवा शासन सिद्ध झाले आहे. वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातील कार्यकर्त्यांना चालना मिळण्यासाठी अमित शहा यांची गोवा भेट महत्त्वाची असल्याचे…

दहिसरमध्ये वारकर्‍यांच्या शिल्पाची विटंबना !

या घटनेवरून आचार्य तुषार भोसले म्हणाले की, राज्यातील सत्ता देव, धर्म आणि वारकरी विरोधी असल्याने समाजकंटांचे असे धैर्य व्हायला लागले आहे. या शिल्पाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.

महापालिकेकडून विद्यार्थ्यांना ‘टॅब’समवेत संकेतस्थळाची सुविधा मिळणार !

तिजोरीत खडखडाट असतांना ४० लाख रुपयांची तरतूद ! शाळा चालू झाल्यानंतरही ‘ऑनलाईन’वर खर्च करण्याचा निर्णय कशासाठी ?

कोळसा शिल्लक नसल्याने महाराष्ट्रात भारनियमन होण्याची शक्यता !

महाजेनकोचे म्हणणे आहे की, यंदा चांगला पाऊस झाला आहे. खुल्या खदाणींमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे कोळशांचे उत्पादन प्रभावित झाले आहे. परिणामी कोळशाचा पुरवठा होत नाही.

मंदिर समितीच्या सदस्याकडून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या गाभार्‍यात पुस्तकाचे प्रकाशन !

मंदिर समितीच्या सदस्यांनीच मंदिराविषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास सर्वसामान्य जनतेने कुणाचा आदर्श घ्यायचा ? मंदिर सरकारीकरणामुळे समितीच्या सदस्यांना हे अभय मिळते का ? असे सामान्य जनतेला वाटल्यास चूक ते काय ?

पुणे येथे महाविद्यालय चालू करण्याचा निर्णय होऊनही शासनाचा आदेश नसल्याने अडथळा !

जिल्ह्यातील महाविद्यालये चालू करण्याचा निर्णय होऊनही त्याविषयी शासनाचा आदेश नसल्याने अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविद्यालये चालू होणार कि नाही ? असा संभ्रम निर्माण झाला आहे.