देवीउपासना !

चहुबाजूंनी संकटात घेरलेल्या मातृभूमीचे संरक्षण करण्याचे दायित्व प्रत्येक भारतियावर आहे. तिच्या रक्षणासाठी, समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. या प्रयत्नांसाठी आत्मबळ हवे. नवरात्रीच्या काळात शक्तिउपासना केल्यास देवी आपल्याला आत्मबळ देईल !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मिरज येथे ठिकठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर !

राष्ट्र आणि धर्म कार्य करणारी हिंदु जनजागृती समिती नेहमीच सामाजिक कार्यातही अग्रेसर असते. त्यातीलच एक भाग म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मिरज येथील आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली.

श्री तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा !

येथे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तृतीयेला श्री तुळजाभवानीदेवीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. भगवान सूर्यनारायणाने त्रिलोक भ्रमणासाठी स्वत:चा रथ श्री भवानीमातेला दिला होता. त्यामुळे देवीला रथअलंकार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका आहे.

पुणे येथील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह १४ जणांवर गुन्हा नोंद !

जमीन दस्त, तसेच नोंदणीत उल्लंघन करून दिशाभूल केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी सहदुय्यम निबंधक एल्.एम्. संगावार यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नागपूर जिल्ह्यात ८० टक्के नमुन्यांमध्ये ‘डेल्टा’ विषाणू प्रकाराचा अंश सापडला !

‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (सी.आय.आय.एम्.एस्.) आणि नॉटिंगहॅम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०२१ ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागांतील सांडपाण्यातून १ सहस्र २०० ते १ सहस्र ४०० नमुने गोळा करण्यात आले. त्यात ७५ ते ८० टक्के नमुन्यांत कोरोनाचे संक्रमण आढळले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३३ नवीन रुग्ण

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४३२ झाली आहे.

बजरंग दलाच्या ३७ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने शाळेत ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायझर’ यांचे वाटप !

बजरंग दलाचा नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार असतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बजरंग दलाच्या ३७ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने जिजामाता शाळा क्रमांक ४ येथे ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायझर’ यांचे वाटप करण्यात आले.

‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे लक्षात घ्या !

राजधानी नवी देहलीमध्ये हिंदूंच्या सणांच्या वेळी जिहादी आतंकवाद्यांकडून घातपात करण्याची माहिती गुप्तचरांना मिळाली आहे.

निर्दाेष मुक्तता करतांना १२ वर्षे अपकीर्ती करणार्‍यांना १२ वर्षे कारागृहात टाका आणि त्यांच्याकडून मानहानीचा दंडही घेऊन निरपराध्यांना द्या !

मिरज शहरात गणेशोत्सवाच्या कालावधीत वर्ष २००९ मध्ये जातीय दंगल उसळली होती. सांगली येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचा खटला चालू होता. हा खटला विसर्जित करण्यात यावा, या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून २ मासांपूर्वी न्यायालयात आवेदन प्रविष्ट करण्यात आले होते.

‘बॉलीवूड’मधून जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य केले जात आहे ! – रमेश सोलंकी, हिंदू आय.टी. सेल

‘रावण-लीला’ चित्रपट आणि ‘कन्यादान’सारखी विज्ञापने करणारे अन्य पंथियांच्या ‘हलाला’, ‘कन्फेशन’ (पापांची स्वीकृती) या पद्धतीतून होणार्‍या बलात्कारांवर चित्रपट का काढत नाहीत ?