बजरंग दलाच्या ३७ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने शाळेत ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायझर’ यांचे वाटप !

बजरंग दलाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना मास्क वाटप केल्यानंतर कार्यकर्ते आणि विद्यार्थी

मिरज, १० ऑक्टोबर (वार्ता.) – बजरंग दलाचा नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार असतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बजरंग दलाच्या ३७ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने जिजामाता शाळा क्रमांक ४ येथे ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायझर’ यांचे वाटप करण्यात आले. या वेळी बजरंग दल मिरज तालुका संयोजक आकाश जाधव, सागर कुंभार, निरंजन साळुंखे, लक्ष्मण हुलवान, करण रखवालदार उपस्थित होते. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.