मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु आणि प्र. कुलगुरु यांच्यासाठी खरेदी केलेल्या महागड्या गाड्यांच्या प्रकरणी चौकशी !
मुंबई विद्यापिठाचे कुलुगुरु प्रा. सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांच्यासाठी ६० लाख रुपयांहून अधिक व्यय करून खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी गाड्यांच्या प्रकरणाची शासनाकडून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा सहसंचालिका डॉ. सोनाली रोडे यांनी केली.