श्री तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा !

श्री तुळजाभवानीदेवीची बांधण्यात आलेली रथ अलंकार महापूजा

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १० ऑक्टोबर (वार्ता.) – येथे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तृतीयेला श्री तुळजाभवानीदेवीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. भगवान सूर्यनारायणाने त्रिलोक भ्रमणासाठी स्वत:चा रथ श्री भवानीमातेला दिला होता. त्यामुळे देवीला रथअलंकार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका आहे.