सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ३३ नवीन रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४३२ झाली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ५० सहस्र १४४ झाली आहे. सद्य:स्थितीत ९२३ रुग्णांवर उपचार चालू आहेत. १० ऑक्टोबर या दिवशी १० जण कोरोनामुक्त झाले.