३ अल्पवयीन मुलींची मुक्तता ४ आरोपी कह्यात
वरोरा (चंद्रपूर), ५ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील २ अल्यवयीन मुली मैत्रिणीच्या वाढदिवसाला जात असल्याचे कारण सांगून घरातून बाहेर पडल्या आणि फेसबूकच्या माध्यमातून ओळख झालेल्या मित्रांकडे वर्धा रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी जाऊन तेथून पसार झाल्या. त्या मुलींच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करून वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. प्राथमिक माहितीच्या आधारे पुणे रांजणगाव येथे मुले-मुली असल्याचे कळल्याने पथकाने तेथे जाऊन त्यांना कह्यात घेतले. या वेळी पोलिसांनी ३ अल्यवयीन मुलींची मुक्तता केली, या तत्परतेचे कौतुक समाजातून होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील ४ आरोपींना पोलिसांनी कह्यात घेऊन पुढील पडताळणी चालू आहे.