अमरावती – अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा ५ ऑक्टोबर या दिवशी निकाल लागला. यात परिवर्तन आणि सहकार पॅनल यांच्यात झालेल्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांचे ‘परिवर्तन पॅनेल’ विजयी झाले आहे. त्यांनी अधिकोषाचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू उपाख्य अनिरुद्ध देशमुख यांचा २ मतांनी पराभव केला. बच्चू कडू विजयी होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. या वेळी बच्चू कडू म्हणाले की, शेतकर्यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध चीड व्यक्त केली होती. त्यांचाच हा विजय आहे. आम्ही हे दाखवून दिले की, जो शेतकर्यांच्या विरोधात जाईल, त्याचा पराभव झाल्याविना रहाणार नाही.