बारामती येथे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !

असे पोलीस गुन्हेगारांना शिक्षा कशी करणार ? लाचखोरी मुळापासून नष्ट करण्यासाठी कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिसांची भरती करणे हाच एकमेव पर्याय आहे !

प्रतीकात्मक छायाचित्र

बारामती (जिल्हा पुणे), ५ ऑक्टोबर – येथील पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी ३० सहस्र रुपयांची लाच स्वीकारणार्‍या संदीपान माळी या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ ऑक्टोबर या दिवशी अटक केली. बारामती शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचे दोषारोपपत्र तक्रारदाराच्या बाजूने पाठवण्यासाठी माळी यांनी तक्रारदाराच्या पत्नीकडे ४० सहस्र रुपयांची लाच मागितली होती.