मुली आणि तरुणी यांनी सतर्कता बाळगून अशा वासनांधांना धडा शिकवायला हवा ! – संपादक

जालना – नोकरी देण्याचे आमीष दाखवल्याने मुंबई येथून २ अल्पवयीन मुली शहरात आल्या होत्या. त्या एकट्या असल्याचा लाभ घेऊन त्यांना विविध ठिकाणी नेऊन त्यापैकी एका मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी त्या मुलीच्या तक्रारीवरून शहरातील ३ जणांना कदीम पोलिसांनी ४ ऑक्टोबर या दिवशी अटक केली आहे. अविनाश जोगदंड, किशोर जोगदंड, गणेश मामा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर या प्रकरणातील आरोपी दीपक राणा पसार आहे. ही घटना सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत घडली आहे. या आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक प्रियांका तुपे करत आहेत.
बंगाल: भाजपच्या महिला कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !