भिंतीवर ‘तालिबान झिंदाबाद’ लिहिणार्या दोघा धर्मांधांना जामीन
अशा धर्मांधांना जामीन मिळाल्यानंतर ते याहून अधिक राष्ट्रघातकी कारवाया करणार नाहीत, याची शाश्वती कोण देणार ? अशांपासून देशाचे रक्षण होण्यासाठी जनतेनेच सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !
पाकिस्तानने तालिबान्यांचा वापर करून काश्मीरमध्ये आक्रमण केल्यास भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे
‘तालिबान : भारतासमोरील नवी आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !
प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ
प्रवेशबंदी आदेशात गृह खाते म्हणते, ‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी याच्या गोवा प्रवेशाने गोव्यात तणाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रवेशबंदीत वाढ करण्यात आली आहे.
सैन्यात भरती होण्यासाठी बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणारी टोळी पोलिसांच्या कह्यात !
बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्या टोळीला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा झाल्यासच अशा घटनांना आळा बसेल !
भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री !
१२ सप्टेंबरला झालेल्या भाजपच्या विधीमंडळ आमदारांच्या बैठकीमध्ये पटेल यांची निवड करण्यात आली.
(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठांकडून मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात !’
अशा धमक्या जर दिल्या गेल्या, तर ही पुरोगामी मंडळी त्या विरोधात संबंधित यंत्रणांकडे तक्रारी का करत नाहीत ? किंवा कुणी धमक्या दिल्या, त्यांची नावे उघड का करत नाहीत ! निवळ हिंदूंना कलंकित करण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत, हे लक्षात घ्या !
(म्हणे) ‘सनातन संस्था ही आध्यात्मिक संघटना पुरोगाम्यांच्या हत्यांना उत्तरदायी ! – आनंद पटवर्धन, लघुपटनिर्माते
पुरोगाम्यांच्या हत्या केल्याचा सनातनच्या विरोधात कोणताही पुरावा नसतांना, तसेच न्यायालयातही हे सिद्ध झाले नसतांना जागतिक स्तरावर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्यासाठी कार्य करणार्या सनातन संस्थेवर चिखलफेक करणारे साम्यवादी !
मेघोली (कोल्हापूर जिल्हा) तलावाचा अपघात हा नैसर्गिक ! – स्मिता माने, कार्यकारी अभियंता
मेघोली तलाव हा ‘क्वाटर्झाईट’ खडकाच्या भुपृष्ठ रचनेतील अंतर्गत हालचालीमुळे फुटला. मेघोली तलावाचा अपघात हा नैसर्गिक आहे. याच खडक थराच्या भुपृष्ठरचनेतील वेदगंगा नदी खोर्यातील इतर तलावही आहेत. त्यामुळे आता याच प्रकारातील जलसंपदा विभागाच्या अन्य प्रकल्पांची भूगर्भीय पहाणी करण्यात येणार आहे..
हिंगोली जिल्ह्यात २९६ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपति’ संकल्पना !
‘एक गाव एक गणपति’ संकल्पना राबवण्याविषयी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. गणेशोत्सव मंडळांनी जिल्ह्यांमध्ये २९६ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना केली आहे.