|
|
मुंबई – सनातन संस्था ही आध्यात्मिक संघटना पुरोगाम्यांच्या हत्यांना उत्तरदायी आहे, असा धादांत खोटा आरोप लघुपटनिर्माते आणि साम्यवादी आनंद पटवर्धन यांनी केला. १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या पहिल्या, म्हणजे १० सप्टेंबर या दिवशीच्या ‘जागतिक हिंदुत्व काय आहे ?’ या सत्रात ते बोलत होते. या वेळी पटवर्धन यांनी हिंदुत्वनिष्ठांची तुलना अमेरिकेतील ‘कू क्लूक्स क्लॅन’ चळवळीशी केली. ‘कू क्लूक्स क्लॅन’ ही अमेरिकेतील श्वेतवर्णियांना अधिकार मिळण्यासाठी प्रयत्न करणारी आणि कृष्णवर्णियांचा द्वेष करणारी कट्टरतावादी आतंकवादी चळवळ होय. (हिंदुत्वनिष्ठ जर कट्टर असते, तर भारतात लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि साम्यवाद अस्तित्वात राहिला असता का ? – संपादक)
— Anand Patwardhan (@anandverite) September 12, 2021
पटवर्धन पुढे म्हणाले की,
१. हिंदुत्वनिष्ठांना मुसलमान, ख्रिस्ती आणि साम्यवादी हे त्यांचे शत्रू वाटतात. या हिंदुत्वनिष्ठांना हिटलरचा ‘राष्ट्रवाद’ मान्य आहे, तसेच नाझींनी ज्या प्रकारे अल्पसंख्यांकांना हाताळले, त्याच प्रमाणे अल्पसंख्यांकांना हाताळण्याचे हिंदुत्वनिष्ठांनी आवाहन केले. (हिंदुत्वनिष्ठांची तुलना हिटलरशी करणारे पटवर्धन यांच्या वैचारिक आतंकवादाला हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारावा ! – संपादक)
२. हिटलरप्रमाणे हिंदुत्व हे वांशिक श्रेष्ठतेवर विश्वास ठेवते आणि जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्याचे स्वप्न पहाते. (हिंदुत्व सार्या विश्वाला सुसंस्कृत करण्याचा विचार देते; मात्र हिंदुद्वेषाचा कंड शमवण्यासाठी हिंदुत्वावर असे आरोप केले जातात ! – संपादक) फार पूर्वी ज्या हिंदुत्ववाद्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला, ते आज राष्ट्रध्वज हातात घेऊन मिरवत आहेत.
३. हे हिंदुत्ववादी ‘आम्हाला राज्यघटना टिकवायची आहे’, असे नाटक करतात; मात्र त्यांना ब्राह्मणांचा ग्रंथ असलेल्या मनु स्मृतीवर आधारित व्यवस्था हवी आहे. (मनु ऋषि हे ब्राह्मण नूसन क्षत्रिय होते, हेही ठाऊक नसलेले पटवर्धन ! अशांना मनुस्मृतीवर बोलण्याचा काय अधिकार ? – संपादक)
४. ब्राह्मणांनी ग्रंथांतील ज्ञान स्वतःपुरते मर्यादित ठेवले. (ऋषी वसिष्ठ, महर्षि व्यास, महर्षि वाल्मीकि यांची पार्श्वभूमी काय होती, याचा पटवर्धन यांनी अभ्यास करावा. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते, तो ब्राह्मण, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते ! हिंदु धर्माविषयी काडीचेही ज्ञान नसणारे असे वक्तव्य करतात ! – संपादक) त्यांचे उच्च जातीय बांधव सत्तेत कसे रहातील, यासाठी त्यांनी प्रयत्न केला.