प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ

श्री. प्रमोद मुतालिक

पणजी, १२ सप्टेंबर (वार्ता.) – प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्या गोवा प्रवेशबंदीत आणखी २ मासांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यशासनाच्या गृह खात्याने हा आदेश काढला आहे. श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्या गोवा प्रवेशबंदी आदेशाची मुदत ६ सप्टेंबर या दिवशी संपल्याने आता पुन्हा नव्याने प्रवेशबंदी आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश ६ सप्टेंबरपासून लागू होत आहे. प्रवेशबंदी आदेशात गृह खाते म्हणते, ‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी याच्या गोवा प्रवेशाने गोव्यात तणाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रवेशबंदीत वाढ करण्यात आली आहे.’’ (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आतंकवादी कारवायांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा हात असल्याचे सांगून तिच्यावर बंदीची शिफारस करूनही प्रशासनाला त्यांच्या गोव्यातील कार्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे वाटत नाही, हे जाणा ! – संपादक) प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर १९ ऑगस्ट २०१४ पासून गोव्यात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी ही प्रवेश बंदी ६ मासांसाठी होती आणि पुढे प्रत्येक वेळी यात वाढकरण्यात येत आहे.