(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठांकडून मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात !’

  • ३ दिवसांच्या हिंदुविरोधी ऑनलाईन चर्चासत्राचा २ रा दिवस

  • ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेत हिंदुत्वाविषयी गरळओक चालूच !

अशा धमक्या जर दिल्या गेल्या, तर ही पुरोगामी मंडळी त्या विरोधात संबंधित यंत्रणांकडे तक्रारी का करत नाहीत ? किंवा कुणी धमक्या दिल्या, त्यांची नावे उघड का करत नाहीत ! निवळ हिंदूंना कलंकित करण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक

मीना कंडासामी

मुंबई – हिंदुत्वनिष्ठांकडून मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या जातात. भारत सरकारकडून हिंदुत्वाचा आधार घेऊन आणि उच्चवर्णियांचे हित जपले जाईल, अशी धोरणे ठरवली जातात. (असे आहे, तर भारतातील उच्चवर्णियांची दुःस्थिती का आहे ? ब्राह्मण पुजार्‍यांना योग्य मानधन न दिल्यामुळे त्यांची वाताहत होत आहे, अशी अनेक उदाहरणे आहेत. असे असतांना धादांत खोटी विधाने करणार्‍या मीना कंडासामी ! – संपादक) दंगली घडवून आणणे आणि मुसलमान स्त्रियांवर बलात्कार करणे यांस उद्युक्त करून नरेंद्र मोदी सत्तेत आले. (एवढा खालच्या थराला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप होत असतांना केंद्र सरकार याची नोंद घेणार का ? – संपादक) उत्तरप्रदेशात मुझफ्फरनगरमध्ये ७ मुसलमान स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले. (हे बलात्कार कुठे झाले, त्या ठिकाणांची नावे हिंदुद्वेष्ट्यांनी घोषित करावीत ! – संपादक) दलितांचा विनाश करणे, हाच हिंदुत्वनिष्ठांचा उद्देश आहे, अशी अत्यंत धादांत खोटी वक्तव्ये तमिळनाडू येथील लेखिका आणि कार्यकर्ती मीना कंडासामी यांनी पहिल्या सत्रात केली. १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत जागतिक स्तरावर ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (जागतिक स्तरावरील हिंदुत्वाचे उच्चाटन) या ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात त्या बोलत होत्या. पहिल्या सत्रात ‘रेप इंडिया’ नावाचा लघुपट दाखवण्यात आला.

अन्य हिंदुद्वेष्ट्यांनी केलेली वक्तव्ये !

१. ‘हिंदुत्वनिष्ठ बांगलादेशींच्या विरोधात भावना पसरवतात.’ – अनिरुद्ध दत्ता  (बांगलादेशी घुसखोर भारतात देशविघातक कारवाया करत आहेत. त्याला विरोध केला, तर अनिरुद्ध दत्ता यांना पोटशूळ का उठतो ? – संपादक)

२. ‘हिंदुत्व हे लोकशाहीचा शत्रू आहे. हिंदु कुटुंबपद्धती ही जातीपद्धत निर्माण करते. या कुटुंबव्यवस्थेचा पुनर्विचार करायला हवा.’ – पी. शिवकामी (हिंदु कुटुंबपद्धत ही आदर्श पद्धत आहे. आता पाश्चात्त्य त्याचा स्वीकार करत असतांना त्याला हिंदुद्वेषी मंडळी विरोध करतात, हे संतापजनक ! – संपादक)