भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री !

भूपेंद्र पटेल यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून घोषित करण्यात आले

कर्णावती (गुजरात) – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून घोषित करण्यात आले आहे. १२ सप्टेंबरला झालेल्या भाजपच्या विधीमंडळ आमदारांच्या बैठकीमध्ये पटेल यांची निवड करण्यात आली.