पूरामुळे बंद असलेला पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सर्वांसाठी खुला !

पुराचे पाणी ओसरू लागले असल्यामुळे आता वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. महामार्गावर अडकून पडलेल्या वाहनचालकांना भोजन आणि निवार्‍याची व्यवस्था जिल्हा पोलीस अन् प्रशासन यांच्या वतीने करून देण्यात आली होती.

हास्यास्पद साम्यवाद !

‘जिथे पृथ्वीवरची सर्व माणसेच नव्हे, तर झाडे, डोंगर, नद्या इत्यादी एकसारखे दिसत नाहीत, तेथे ‘साम्यवाद’ हा शब्दच हास्यास्पद नाही का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पूरग्रस्तांना २ कोटी ५० लाख रुपयांच्या साहित्यांचे वाटप करण्यात येणार ! – शरद पवार

येत्या २ दिवसांत २ कोटी ५० लाख रुपयांचे साहाय्य गरजू लोकांना पोचवणार आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने २५० आधुनिक वैद्यांचे पथक सिद्ध करण्यात आले आहे.

अश्लीलतेचा उघडपणे प्रसार करणार्‍या ‘ओ.टी.टी.’ माध्यमांवर कठोर कारवाई करावी ! – मुकेश खन्ना, ज्येष्ठ अभिनेते

अश्लीलतेचा प्रसार करणारे राज कुंद्रा हे एकमेव नाहीत. पैशांसाठी असे अनेकजण युवकांना अश्लीलतेच्या नरकात ढकलत आहेत. तरुण मुलींना खोटे सांगून या व्यवसायात ओढत आहेत.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या सूचीमध्ये तेलंगाणामधील रुद्रेश्वर मंदिराचा समावेश

वर्ष १२१३ मध्ये राजा गणपतिदेवा यांच्या काकतीय साम्राज्याच्या कारकीर्दीत मंदिर बांधले गेले होते. येथील प्रमुख देवता रामलिंगेश्वरस्वामी आहेत.

आता पोस्टातूनही बनवून घेता येणार पारपत्र !

भारतीय पोस्टातून आता पारपत्रही बनवून घेता येणार आहे. भारतीय पोस्ट खात्याने याची माहिती ट्वीट करून दिली आहे. यात म्हटले आहे, ‘पोस्टातील सी.एस्.सी. काऊंटरवर पारपत्रासाठी नोंदणी आणि अर्ज करू शकता.

अभिनेता कमाल खान यांच्यावर एका ‘मॉडेल’चा बलात्काराचा आरोप !

ताशा नावाच्या ‘फिटनेस मॉडेल’ने अभिनेता कमाल आर्. खान यांच्यावर बलात्काराचा आरोप करून त्यांच्या विरोधात २६ जून २०२१ या दिवशी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

सरकारी कर्मचार्‍यांसाठी भ्रमणभाष वापरासंबंधी मार्गदर्शक नियमावली घोषित !

कार्यालयात भ्रमणभाष वापरतांना शिष्टाचार न पाळल्याने सरकारची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे या सूचना घोषित केल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना देऊ नये ! – कर्नाटक शासनाचा आदेश

कर्नाटकातील भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! असा आदेश प्रत्येक राज्यशासनाने काढला पाहिजे, यासाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत !