
सातारा, २८ जुलै (वार्ता.) – गत ४ ते ५ दिवसांपासून पुराच्या पाण्यामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बंद असलेली वाहतूक आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. पुराचे पाणी ओसरू लागले असल्यामुळे आता वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. महामार्गावर अडकून पडलेल्या वाहनचालकांना भोजन आणि निवार्याची व्यवस्था जिल्हा पोलीस अन् प्रशासन यांच्या वतीने करून देण्यात आली होती. आनेवाडी, तासवडे टोलनाका तसेच विविध गावांच्या सीमेत वाहने थांबवण्यात आली होती, तसेच सातारा जिल्ह्यातील वाहतूकदार संघटनांनीही शिरवळ ते शेंद्रे या भागातील महामार्गावर अडकून पडलेल्या वाहतूकदारांची भोजनाची व्यवस्था केली.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !