सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार आणि साधक अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘गुरुपौर्णिमा’ म्हणजे आत्मोद्धाराचा दिव्य मार्ग दाखवणार्‍या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! सनातनच्या साधकांना साक्षात् ‘मोक्षगुरु’ लाभल्याने केवळ गुरुपौर्णिमेचा दिवसच नव्हे…

संचारबंदीतही चालू असलेल्या ‘डान्स पार्टी’वर पुणे पोलिसांची धाड !

सिंहगड, डोणजे आणि आजूबाजूच्या परिसरात संचारबंदी आहे.  सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील ‘सानवी रिसॉर्ट’मध्ये चालू असलेल्या ‘डान्स पार्टी’वर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली.

पूर परिस्थितीत अडकलेल्या प्रत्येकाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री 

तांदूळ, डाळी आणि रॉकेल यांचा पुरवठा करण्यासमवेतच १ लाख लोकांचे स्थलांतर केले असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योगपती राज कुंद्रा यांची सिटी आणि कोटक महिंद्रा या बँकांतील खाती गोठवली !

अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याच्या व्यवसायाप्रकरणी अटकेत असणारे उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर गुन्हे शाखेने कारवाई करत त्यांची सिटी आणि कोटक महिंद्रा या बँकांतील खाती गोठवली आहेत.

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाचे संकट !

राज्यातील कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला.

राज्यात अतीवृष्टीमुळे ४ दिवसांत २०० जणांचा मृत्यू, तर २४ जण घायाळ !

आपत्काळाला आरंभ झाला असल्याने आतातरी साधना करायला हवी, हे लक्षात घ्या !

महापुरामुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिक त्रस्त !

नुकताच येऊन गेलेला महापूर आणि त्यानंतर निर्माण झालेली भीषण स्थिती ही तर आपत्काळाची झलकच आहे. यापुढे येणार्‍या महाभयंकर आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये, यासाठी स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने चालू करण्यात यावा. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने चालू होईल, यासाठी दुरुस्तीची कामे हाती घ्या.

दरड आणि पूर यांमुळे राज्यात ६ सहस्र कोटी रुपयांच्या हानीचा अंदाज !

पिकांची हानीभरपाई, रस्ते, वाहून गेलेल्या पुलांची बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचे पुनर्वसन करणे, तसेच लोकांना साहाय्य करणे आदींसाठी अर्थसाहाय्य देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.

राज्यातील १६ जिल्ह्यांत १ सहस्र १२९ पाणीपुरवठा योजना बाधित !

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, तसेच राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतीवृष्टी आणि महापूर यांमुळे राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये १ सहस्र १२९ पाणीपुरवठा योजना बाधित झाल्या आहेत.