सांगली, २८ जुलै (वार्ता.) – येथील पूरग्रस्त हरभट रस्ता, कापड पेठ आणि मारुति रस्ता येथे भाजप आणि श्रीराम प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबवले. भाजपचे प्रदेश सदस्य शेखर इनामदार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काम केले.
या स्वच्छता अभियानात दीपक माने, नगरसेवक संजय कुलकर्णी, दरीबा बंडगर, विशाल मोरे, पृथ्वीराज पाटील, अमित गडदे, अमित भोसले, राहुल ढोपे पाटील, राजु जाधव, राहुल माने, प्रियानंद कांबळे, रवींद्र ढगे सर, गौस नदाफ, सचिन बाल नाईक, ऋषिकेश माने, चंदु घुणके, बाळासाहेब बेलवलकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी महापालिकेचे स्वच्छता कर्मचारीही उपस्थित होते.