लाच स्वीकारतांना धाराशिव येथे महसूल विभागाच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासह एकाला अटक  

अधिकार्‍यांकडून विनाकारवाई वाळू वाहतूक करण्यासाठी प्रतिमाह १ लाख रुपये हप्त्याची मागणी

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

धाराशिव – भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह एकाला येथील लाचलुचपत विभागाने २७ जुलै या दिवशी अटक केली. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणार्‍या विक्रेत्याकडे वाळूचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. १ लाख १० सहस्र रुपयांची प्रतिमाह हप्तारूपी लाच स्वीकारतांना मनीषा राशिनकर आणि कोतवाल विलास जानकर यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार यांचा एक टीप्पर, एक जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर हे विनाकारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी या अधिकार्‍यांनी लाच मागितली होती. (भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीच सामान्य जनतेची मागणी आहे. – संपादक)