न्यायालयाचा ‘न्यायमंदिर’ असा उल्लेख असलेल्या फलकावर मानवी हक्क कार्यकर्ते अधिवक्ता विकास शिंदे यांचा आक्षेप

जामखेड येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर अनेक वर्षांपासून असलेल्या फलकावर मानवी हक्क कार्यकर्ते अधिवक्ता विकास शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. फलकावर न्यायालयाचा ‘न्यायमंदिर’ असा उल्लेख आहे.

यापुढे आधुनिक वैद्यांवर आक्रमण करणार्‍यांवर उपचार केले जाणार नाहीत !

कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आधुनिक वैद्य रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र काही समाजकंटक हे आधुनिक वैद्यांवरच आक्रमण करतात. त्यामुळे आधुनिक वैद्यांचे मनोधैर्य खचत आहे.

माटुंगा, शीव, कुर्ला, ठाणे, बदलापूर रेल्वेस्थानकांत पूर मदत दल तैनात करणार !

मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर चोहोबाजूने पाणी साचत असल्याने बोटीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी पूर मदत दल (आर्.एफ्.आर्.टी.) हे माटुंगा, शीव, कुर्ला, ठाणे, बदलापूर या सखल भागांतील रेल्वेस्थानकांमध्ये तैनात केले जाणार आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या तरुणाला अटक !

नवी मुंबई येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाला राज्य सरकारने ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव संमत करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे.

शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक !

कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ५२९ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहाराच्या प्रकरणी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांना १५ जूनला अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) पनवेल येथून अटक केली. 

घातकी परावलंबित्व !

सध्याचे सामाजिक माध्यम क्षेत्रातील परावलंबित्व देशासाठी घातक आहे, हे सरकारने लक्षात घेऊन वेळीच यावर दूरगामी उपाय योजणे, यातच देशहित आहे !

वायूप्रदूषणाचा घातक विळखा !

वायूप्रदूषण सहसा हिवाळ्यात अधिक होते; मात्र गेल्या ३ वर्षांत उन्हाळ्यातही वायूप्रदूषणात वाढ झाली आहे, असे तज्ञांनी म्हटले आहे. हवेतील सूक्ष्म आणि अतीसूक्ष्म धूलिकणांत लक्षणीय वाढ झाल्याचीही माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

आर्वी (वर्धा) शहरातील चिखल हटवण्यासाठी ‘प्रहार सोशल फोरम’च्या वतीने चिखलात लोळत आंदोलन !

हे आंदोलन संघटनेचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

अशा आस्थापनांवर कारवाई झाली पाहिजे !

‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाईन विक्री करणार्‍या आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे प्रणयक्रीडा करतांनाचे चित्र असलेले भ्रमणभाषचे ‘कव्हर’ विक्रीसाठी ठेवले होते. विरोधानंतर ते हटवण्यात आले.

धर्मांतर रोखण्यासाठी कायद्याची कार्यवाही व्हावी !

‘धर्मांतर रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण आहे; पण पोलीस आणि प्रशासन यांनी त्याची कार्यवाही कठोरपणे केली पाहिजे.’