चिरंतन आनंदप्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

‘देवावर आणि साधनेवर विश्‍वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो.’

केरळ येथे धर्मांध शहानवाज याने हिंदु प्रेयसीला जिवंत जाळले !

हा आहे ‘लव्ह जिहाद’चा पुरावा ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते लव्ह जिहादला बळी पडून जिवाला मुकतात ! यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची असलेली अपरिहार्यता दिसून येते !

दुसर्‍या बँकेतील एटीएम्मधून पैसे काढण्याच्या शुल्कामध्ये होणार वाढ !

कोणत्याही बँकेच्या एटीएम्मधून एका मासामध्ये विनामूल्य व्यवहारांनंतर होणार्‍या व्यवहारांवरील शुल्क २० रुपयांवरून २१ रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे.

बांगलादेशात इस्लामी कट्टरवाद्यांकडून ‘बांगलादेश हिंदु संघटने’च्या नेत्याची हत्या !

बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू ! सरकार याविषयी बांगलादेशकडे किमान शाब्दिक निषेध तरी नोंदवणार का ?

चीन आणि पाक यांच्याकडून लडाख सीमेजवळ लढाऊ विमानांकडून बॉम्बफेकीचा सराव

चीनने लडाख सीमेवरील त्याच्या तिबेटमधील भागामध्ये लढाऊ विमानांद्वारे युद्धसराव चालू केला आहे. या सरावामध्ये पाकच्या वायूदलाचाही सहभाग आहे. चीनकडून थेट बॉम्बफेक करण्याचाही सराव करण्यात येत आहे. भारताचे सुखोई लढाऊ विमान कसे पाडता येईल, याचा विशेष सराव करण्यात येत आहे.

हेरगिरीसाठी चालवण्यात येणार्‍या बेंगळुरू येथील अवैध दूरभाष केंद्रावर पोलिसांची धाड !

कर्नाटक पोलीस आणि सैन्याचा गुप्तचर विभाग यांनी येथे अवैधरित्या चालवण्यात येणारे दूरभाष केंद्र (टेलिफोन एक्सचेंज) यांवर धाड टाकून ते बंद केले. या केंद्रात आंतरराष्ट्रीय कॉल आल्यावर ते स्थानिक कॉलमध्ये परावर्तित करण्यात येत होते.

फलटण (जिल्हा सातारा) येथे अवैध गोमांस विक्रीप्रकरणी गत ६ मासांत १७ जणांना अटक

हा एकूण १ कोटी रुपयांहून अधिक मुद्देमाल आहे. या कारवायांमध्ये आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली असून ४१ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नागपूर महापालिकेत औषधांचा कोट्यवधी रुपयांचा अपव्यवहार ! – नगरसेविका आभा पांडे यांचा आरोप

‘कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून मिळालेले शासकीय अनुदान खर्च करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या होत्या; मात्र महापालिकेने नियमबाह्य पद्धतीने प्रशासनाकडून औषध खरेदी करून त्यात मोठा अपव्यवहार केला आहे’,

महान पराक्रमी राजांच्या शौर्याचे स्मरण करून देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा ! – नीलेश शेटे, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

कोंढवा (पुणे) परिसरात हवेत तलवारी फिरवून दहशत निर्माण करणार्‍या धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंद !

हप्तेवसुलीसाठी धर्मांधांच्या टोळीने हवेत तलवारी फिरवून कोंढवा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सलग २ दिवस चालू असलेल्या या प्रकाराचा स्थानिक नागरिकांनीच प्रतिकार करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली.