दुसर्‍या बँकेतील एटीएम्मधून पैसे काढण्याच्या शुल्कामध्ये होणार वाढ !

नवी देहली – दुसर्‍या बँकेच्या एटीएम्मधून व्यवहार केला, तर त्यावरील प्रतिमहा शुल्क १५ रुपयांवरून १७ रुपये अशी वाढ करण्याचे रिझर्व्ह बँकेने घोषित केले आहे. तसेच कोणत्याही बँकेच्या एटीएम्मधून एका मासामध्ये विनामूल्य व्यवहारांनंतर होणार्‍या व्यवहारांवरील शुल्क २० रुपयांवरून २१ रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे. कोणत्याही बँकेच्या एटीएम्मध्ये प्रत्येक मासाला ५ वेळ व्यवहार विनामूल्य करता येऊ शकतो.