बांगलादेशात इस्लामी कट्टरवाद्यांकडून ‘बांगलादेश हिंदु संघटने’च्या नेत्याची हत्या !

  • बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू ! सरकार याविषयी बांगलादेशकडे किमान शाब्दिक निषेध तरी नोंदवणार का ?
  • जगभरातील हिंदूंचे रक्षण होण्यासाठी प्रथम हिंदुबहूल भारतामध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक !

ढाका (बांगलादेश) – इस्लामी कट्टरवाद्यांनी ९ जूनच्या पहाटे ‘बांगलादेश हिंदु महाजोत’चे (बांगलादेश हिंदु संघटनेचे) नेते रवींद्रचंद्र दास (वय ४० वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या केली. रवींद्रचंद्र दास हे नोआखली जिल्ह्यातील ‘बांगलादेश हिंदु महाजोत’चे नेते होते. दास यांनी अनेक प्रसंगी अल्पसंख्यांक हिंदूंकडून अवैध कर गोळा करणार्‍या इस्लामवाद्यांचा निषेध केला होता. दास हे सत्ताधारी अवामी लीगचे नेते आणि स्थानिक सरकारी संस्थेचे सदस्य होते.

पहाटे रवींद्रचंद्र हे अल् अमीन यांच्यासमवेत दुचाकीवरून घरी जात असतांना आक्रमकर्त्यांच्या एका टोळीने त्यांच्यावर आक्रमण केले. यात अल् अमीन पळून गेला, तर दास यांना या टोळीने पकडले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या,. तसेच त्यांच्यावर धारदार शस्त्राने वारही केले. यात दास जागीच ठार झाले.