सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन
सोलापूर – सद्य:स्थितीत विविध प्रकारे हिंदूंचे खच्चीकरण केले जाते. हिंदू शौर्य विसरल्यामुळे आज हिंदु धर्मावर अनेक आघात होत आहेत. स्वतःचे रक्षण करणे, हा कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही. वर्ष १८५७ नंतर हिंदूंच्या हातातूनच नाही, तर मनातूनही शस्त्रे काढून घेतली आणि त्यांना शौर्यहीन करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक हिंदूने शौर्याची पूजा करणे, ही काळाची आवश्यकता आहे. प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई आणि महान पराक्रमी राजे यांच्या शौर्याचे स्मरण करून देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश शेटे यांनी केले. ते ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होते. या व्याख्यानाला सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांतील धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या व्याख्यानाचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. ज्ञानदीप चोरमले यांनी सांगितला, तर सूत्रसंचालन कु. शीतल पारे यांनी केले.
अभिप्राय
|