४१ जणांविरुद्ध गुन्हा नोंद, तर ५ हून अधिक आरोपींविरुद्ध सीमापारीचा प्रस्ताव
यावरून ‘राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा केवळ कागदावरच आहे’, असे वाटल्यास चूक ते काय ! गोवंशियांची हत्या करणार्यांवर कठोर आणि त्वरित कारवाई केली, तरच गुन्हेगारांवर वचक बसेल, हे पोलिसांनी लक्षात घ्यायला हवे !

सातारा, ११ जून (वार्ता.) – फलटण शहरातील कुरेशीनगर भागात गत ६ मासांत पोलिसांनी केलेल्या कारवायांत १४ वाहने आणि ३ टन वजनाहून अधिक गोमांस शासनाधीन करण्यात आले. हा एकूण १ कोटी रुपयांहून अधिक मुद्देमाल आहे. या कारवायांमध्ये आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली असून ४१ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच ५ हून अधिक आरोपींविरुद्ध सीमापारीचे (तडीपारीचे) प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. (कारवाई न झालेल्या गुन्हेगारांची संख्या किती असेल ? पोलीस गोवंशियांची हत्या करणार्यांवर धाक केव्हा निर्माण करणार ? – संपादक)
फलटण पोलिसांनी गत ६ मासांत किमान २५० गोवंशियांचे प्राण वाचवले आहेत. कुरेशीनगर भागात अजूनही चोरट्या मार्गाने गोवंशियांची हत्या चालूच आहे. पोलिसांनी कह्यात घेतलेल्या मुद्देमालाहून अधिक उलाढाल चालू आहे. (ही पोलिसांची अकार्यक्षमता आहे कि गुन्हेगारांपुढे पत्करलेली हतबलता, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !