सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार !

सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांनी १० जून या दिवशी देहत्याग केला. ११ जून या दिवशी सकाळी ९.३० वाजता येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागपूर येथील शासकीय रुग्णालयात तोतया आधुनिक वैद्याला पकडले !

दोन मासांपासून नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला एक जण बनावट वैद्य बनून रुग्णालयात उघडपणे वावरत असतांना आधुनिक वैद्य आणि अन्य कर्मचारी यांच्यापैकी कुणाच्याच कसे लक्षात येत नाही ? यातून रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर येतो !

पद, प्रतिष्ठा आणि प्रलोभने यांकडे दुर्लक्ष करून केवळ धर्मासाठी निरपेक्षपणे कृती करणे आवश्यक ! – मनोज खाडये, गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘जय श्रीराम सेने’च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

मान्सूनपूर्व पावसामुळे उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत ३ टक्क्यांनी वाढ !

चालू पावसाळी हंगामाच्या आरंभीच्या ७ दिवसांत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या धरण साखळी क्षेत्रात १ सहस्र ३४८ मिलीमीटर, तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

राज्य सरकारने १०० वारकर्‍यांना पायी वारीला जाऊ द्यावे ! – रवींद्र पाटील, अध्यक्ष, श्रीसंत मुक्ताई संस्थान

जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्रीसंत मुक्ताईंचा पालखी सोहळा १४ जून या दिवशी प्रस्थान करणार आहे. यावर्षी सुदैवाने वारी काळात कोरोनाचा संसर्ग काहीअंशी अल्प झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रमाणावरून राज्यातील जिल्हानिहाय निर्बंध घोषित !

कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रमाणावरून राज्य सरकारने १४ ते २१ जून या कालावधीसाठी ५ टप्प्यांनुसार जिल्हानिहाय निर्बंध घोषित केले आहेत. यापुढे आता प्रत्येक आठवड्याला अशा प्रकारचे प्रमाण सरकारकडून घोषित करण्यात येणार आहे.

खटला लढण्यासाठी विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी अधिवक्ता निकम आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा केली. येत्या २ दिवसांत यावर निर्णय होणे अपेक्षित आहे, असा निरोप त्यांनी ‘जस्टीस फॉर दीपाली’ समूहाच्या प्रमुख अरुणा सबाने यांना दिला आहे.

मालाड इमारत दुर्घटनेप्रकरणी न्यायालयाला उत्तरदायी ठरवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महापौरांना फटकारले

मालाड येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी ‘न्यायालयाचा आदेश असल्याने अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील कारवाई थांबली’, असे वक्तव्य सौ. पेडणेकर यांनी केले होते.

मंदिरे आणि धर्मभ्रष्टता !

भारतातील सर्व मंदिरांची जपणूक करणे आणि तेथील सात्त्विकता टिकवणे यांसाठी श्रद्धाळू भाविकच हवेत. ही धार्मिक बाजू केंद्र सरकारने लक्षात घ्यावी !

किल्ले दुरवस्थेत !

ऐतिहासिक वारसा पूर्ण संपुष्टात येण्यापूर्वी सरकारने समाजामध्ये राष्ट्र-धर्म प्रेम निर्माण करणे आणि किल्ल्यांचे पावित्र्य जपणे यांसाठी प्रयत्न केल्यास किल्ल्यांची दुरवस्था होणार नाही.