|
|

अंचल (केरळ) – ‘इन्स्टाग्राम’वर प्रेयसीने स्वतःचे व्हिडिओ प्रसारित करणे आवडत नसल्याने धर्मांध शहानवाज याने तिच्यावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. अथिरा (वय २८ वर्षे) असे या हिंदु महिलेचे नाव असून ते दोघे जण ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात होते. ८ जून या दिवशी ही घटना घडली.
१. अथिरा ही तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर गेल्या २ वर्षांपासून शहानवाज याच्यासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात होती.
२. अथिरा ‘इन्स्टाग्राम’वरून तिचे काही व्हिडिओ प्रसारित करत होती. हे शहानवाजला आवडत नव्हते. घटनेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता या सूत्रावरून दोघांमध्ये वादविवाद झाले. यानंतर राग अनावर होऊन शहानवाजने अथिराच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिंवत जाळले.
३. यानंतर काही लोकांनी अथिराच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यांनी बाहेर धावत जाऊन पाहिले असता त्यांना अथिरा जळत असल्याचे दिसले. सर्वांनी मिळून तिला थिरूवनंतपूरम् वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती केले.
४. मृत्यूपूर्वी तिने पोलिसांना सांगितले की, शहानवाज हा विवाहित असून त्यानेच माझ्यावर रॉकेल टाकून मला जाळले.
५. अथिराच्या शेवटच्या जबाबाच्या आधारावर पोलीस शहानवाजवर लक्ष ठेवून आहेत. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
६. शहानवाज आणि अथिरा यांना ६ मासांची एक मुलगी आहे. तसेच पूर्वी हे दोघे विवाहित होते. दोघांनाही २ अपत्ये आहेत.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण