भाजपला वर्ष २०१९-२० मध्ये ७८५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या !

काँग्रेसला १३९ कोटी रुपयांच्या देणग्या !

नवी देहली – निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार वर्ष २०१९-२० मध्ये भाजपला ७८५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला १३९ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. याचा अर्थ काँग्रेसच्या तुलनेत भाजपला ५ पटींहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत. याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसला ५९ कोटी, तृणमूल काँग्रेसला ८ कोटी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला १९ कोटी ६० लाख रुपये, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला १ कोटी ९० लाख रुपये देणग्या मिळाल्या आहेत. वर्ष २०१९-२० मध्ये ‘प्रुडेंट इलेक्टोरल फंड’च्या माध्यमातून भाजपला २१७ कोटी ७५ लाख, तर ‘जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट’कडून ४५ कोटी ९५ लाख रुपये मिळाले आहेत.

प्रादेशिक पक्षांचा विचार करता सर्वाधिक देणग्या तेलंगाणा राष्ट्र समिती या पक्षाला मिळाल्या आहेत. त्याला सर्वाधिक १३० कोटी ४६ लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या, तर वाय.एस्.आर्. काँग्रेसला ९२ कोटी आणि बिजू जनता दलाला ९० कोटी ३५ लाख रुपये मिळाले आहेत.