गीता प्रेसला कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट नाही !

भाजपचे खासदार रवि किशन

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील गीता प्रेस आर्थिक संकटात आहे. त्यामुळे ही प्रेस बंद होणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत असल्याचे पाहून मला आश्‍चर्य वाटले. मी या प्रेसमध्ये जाऊन प्रत्यक्ष माहिती जाणून घेतल्यावर प्रेसला कोणतेही आर्थिक संकट नसल्याचे माझ्या लक्षात आल्याने मला आनंद झाला. गेल्या अनेक दशकांपासून ही प्रेस सनातन धर्माचा प्रसार करत आहे. ती चांगल्या प्रकारे चालू आहे, अशी माहिती येथील भाजपचे खासदार रवि किशन यांनी दिली.

रवि किशन म्हणाले की, प्रेस पूर्णपणे आत्मनिर्भर आहे. प्रतिमहा कर्मचार्‍यांना ८० लाख रुपयांचे वेतन दिले जाते. येथे प्रतीमहा १५ भाषांमध्ये ग्रंथ प्रकाशित केले जातात. येथे छपाईची अत्याधुनिक यंत्रे आहेत. प्रेसला आर्थिक चणचण नाही. ही प्रेस देणगी स्वीकारत नाही.