सूर्यग्रहणामुळे जगात युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिषाचे भविष्यकथन

सूर्यग्रहण

नवी देहली – यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण १० जून या दिवशी झाले. त्यापूर्वी २६ मे या दिवशी चंद्रग्रहणही झाले होते. हे दोन्ही ग्रहण भारतात केवळ काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश येथून काही प्रमाणात दिसले. सूर्यग्रहण ज्येष्ठ अमावास्या आणि शनि जयंती या दिवशी आल्याने त्याला विशेष महत्त्व निर्माण झाले. याविषयी ‘आज तक’ वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या ज्योतिषाचार्य कमल नंदलाल यांच्या भविष्यकथनानुसार याचा संपूर्ण जगामध्ये अनिष्ट परिणाम दिसून येणार आहे. जगात युद्ध आणि अग्नीप्रकोप अशा घटना घडण्याची शक्यता आहे.

ज्योतिषाचार्य कमल नंदलाल यांनी केलेले भविष्यकथन

१. भारतात काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश येथे २६ मे या दिवशी चंद्रग्रहण दिसले होते. आता सूर्यग्रहणही तेथेच दिसले. त्यामुळे काश्मीर, पंजाब, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि नागालँड या भागात संकटाची स्थिती निर्माण होऊ शकते. या भागात पुढील ४५ ते ९० दिवसांत घुसखोरीच्या घटना घडू शकतात किंवा सीमेवर मोठे संकट उत्पन्न होऊ शकते. तसेच जगात भूकंपही येऊ शकतात.

२. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दोन्हीही चीन अन् अमेरिका येथे दिसले होते. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये पुढील ४५ ते ९० दिवसांत युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते. युद्धाची स्थिती जगाच्या मध्यावरही दिसणार आहे. मध्यावर इस्रायल देश आहे. तेथेही पुन्हा युद्धसदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते.