तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ धडकणार !

बंगाल आणि ओडिशा या राज्यांना फटका बसण्याची शक्यता

कोरोना, तसेच एका पाठोपाठ एक येणारी चक्रीवादळे अशा घटना आपत्काळाचेच द्योतक आहे. आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे, हे आता तरी लक्षात घ्या !

नवी देहली – तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ पूर्वेकडील बंगाल आणि ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टींवर धडकण्याची चेतावणी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. बंगालमध्ये २५ मे या दिवशी, तर ओडिशामध्ये २६ मे या दिवशी हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाला असून समुद्रातील पाण्याच्या तापमानात वाढ झाली आहे. ओमान या देशाने या वादाळाला ‘यास’ असे नाव दिले आहे. ‘हे चक्रीवादळ तौक्ते चक्रीवादळाइतके संहारक नसेल’, असेही सांगण्यात येत आहे.