कोरोनाचे वैश्‍विक संकट दूर व्हावे, याकरिता पुणे येथील दगडूशेठ गणपति मंदिरात विशेष यागांचे आयोजन

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्टच्या वतीने कोरोना संकट निवारणासाठी विशेष यागांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मृत्युंजय आणि धन्वंतरी महायाग १८ मे या दिवशी पार पडला. वेदमूर्ती नटराज शास्त्री आणि ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत हे धार्मिक कार्यक्रम चालू आहेत. देशावरचे आणि राज्यावरचे कोरोनाचे संकट दूर व्हावे, याकरिता गणरायाच्या चरणी प्रार्थनाही करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ट्रस्टच्या ‘ऑनलाईन’ माध्यमांद्वारे २४ घंटे दर्शनाची सुविधा करण्यात आली आहे. तरी भाविकांनी घराबाहेर न पडता ‘ऑनलाईन’ दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी या वेळी केले.