‘‘तुमचे योगदान जग कदापि विसरणार नाही !’’

तुमचा त्याग आणि समर्पण यांना मानाचा मुजरा आहे. तुमचे हे योगदान जग कदापि विसरणार नाही, अशा शब्दांत राज्यांतील परिचारिकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौरव केला.

वैद्यकीय अधिकार्‍यांना शिवीगाळ करणार्‍या आमदार कांबळे यांना तात्काळ अटक करा ! – रामदास तडस, खासदार, भाजप

जिल्ह्यातील देवळी येथील काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी भाजपच्या वतीने ११ मे या दिवशी त्यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे. ‘सरकारी कामात हस्तक्षेप केल्याच्या प्रकरणी आमदार रणजित कांबळे…..

‘शरद पवारसाहेब, तुम्ही मद्यवाल्यांसाठी पत्र लिहिले; शेतकर्‍यांसाठीही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा !’

‘जनसेवेमध्ये मग्न असणारे बारमालक, मद्य विक्रेते यांना मालमत्ता कर, विजेचे देयक, अबकारी कर यांमध्ये सवलत देण्याची मागणी करण्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

रशियामध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू 

रशियातील कझान शहरातील एका शाळेत करण्यात आलेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला. यात ८ लहान मुलांचा आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. गोळीबार झाल्यावर तिसर्‍या मजल्याच्या खिडकीतून दोन मुलांनी खाली उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत बालकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने बालरोगतज्ञांचा ‘टास्क फोर्स’ सिद्ध होत आहे ! – आधुनिक वैद्य जयंत पांढरीकर

कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी जीवघेणी ठरली, तर दुसर्‍या लाटेत अनेक तरुणांना प्राण गमवावे लागले. आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत दिले आहे. तिसर्‍या लाटेत बालकांवर परिणाम होण्याची भीती आहे.

महावितरणच्या ३५ सहस्र कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण ! – विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक

महावितरणच्या ३५ सहस्र ६०० नियमित आणि बाह्यस्रोत कर्मचार्‍यांना कोरोनाची प्रतिबंधक लस देण्यात आली असून सध्या २ सहस्र २२१ कर्मचारी कोरोनाबाधित आहेत, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.

काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद !

वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे प्रकरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद ! आरोग्य अधिकार्‍यांना शिवीगाळ करणारे काँग्रेसचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी ! वर्धा – येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात … Read more

प्रशासनाकडून धडाडीने काम हवे !

सर्वसामान्यांच्या आधारासाठी आणि कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सध्या प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि याच वेळी समाजात चाललेले अपप्रकार या दोन्हीचा आवाका इतका मोठा आहे की, प्रशासन सर्वांपर्यंत पोचत नसल्याचे चित्र आहे.

६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक डॉ. नंदकिशोर वेद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास  असलेले आणि मूळचे अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक डॉ. नंदकिशोर वेद (वय ६८ वर्षे) यांचे ११ मे या दिवशी सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

पुणे येथील ‘अपेक्षा’ मासिकाचे सहसंपादक सम्राट नाईक यांचे निधन

‘अपेक्षा’ मासिकाचे सहसंपादक, ज्येष्ठ साहित्यिक, कवी, वात्रटिकाकार, व्यंगचित्रकार, गायक, वादक, कलाकार असे व्यक्तिमत्त्व असणारे सम्राट नाईक (वय ६७ वर्षे ) यांचे १० मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.