रशियामध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू 

२ आक्रमणकर्ते ठार

मॉस्को (रशिया) – रशियातील कझान शहरातील एका शाळेत करण्यात आलेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला. यात ८ लहान मुलांचा आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. गोळीबार झाल्यावर तिसर्‍या मजल्याच्या खिडकीतून दोन मुलांनी खाली उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोचलेल्या सुरक्षारक्षकांनी दोघा आक्रमणकर्त्यांना ठार केले आहे. यातील एकाचे वय अवघे १९ वर्षे आहे. या आक्रमणाचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.