उत्तरप्रदेशातील कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याने १० सहस्र बंदीवानांना सरकार पॅरोलवर सोडणार !

सोडण्यात आलेले बंदीवान बाहेर जाऊन कोरोनाच्या काळात गुन्हेगारी कृत्य करणार नाहीत, यावर सरकारने लक्ष ठेवले पाहिजे !

महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग अडचणीत ; उद्योजक चिंतेत

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे राज्यात दुसर्‍यांदा दळणवळण बंदी लागू करण्यात आल्याने वस्त्रोद्योगाची आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. या बंदीमुळे कामगारांना कामावर उपस्थित होण्यात अडचणी येत असल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.

मृतदेह आणि माणुसकी !

उत्तरप्रदेश आणि बिहार येथे गंगानदीमध्ये २-३ दिवसांत अनेक मृतदेह सापडत आहेत. बक्सर (बिहार) येथे ४० मृतदेह वाहून आले आहेत. यापूर्वी उत्तरप्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील नदीच्या किनारी अशाच प्रकारे मृतदेह वाहून आले होते. पूर्वी हमीरपूर आणि कानपूर जिल्ह्यांतही गंगानदी किनारी मृतदेह सापडले होते.

संभाजीनगर येथे वेळेवर वेतन देण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचे ‘ऑनलाईन’ आंदोलन चालू !

‘गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचे वेतन नेहमीच अनियमित होत आहे. २-२ मास विलंबाने वेतन होत असल्यामुळे शिक्षकांना प्रचंड आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. यामुळे शिक्षकांचे वेतन मासाच्या पहिल्या दिनांकाला झाले पाहिजे’, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांनी…..

नमाजपठणासाठी मशिदीत किंवा मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये !

अनेक मुस्लिमबहुल भागांत कोरोनाविषयी नियमांचे पालन होत नाही; तसेच धर्मांधांच्या आक्रमकतेमुळे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकशाहीमध्ये नियम सर्वांना सारखा लागू असावा आणि त्याची कार्यवाहीही सर्वांसाठी समान असावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

राज्यात ३१ मेपर्यंत दळणवळण बंदीची मंत्रीमंडळाची मागणी, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घोषित करतील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात दळणवळण बंदीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील दळणवळण बंदी ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे; मात्र याविषयीची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

उत्तरप्रदेशात संशयित आरोपीला कह्यात घेण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाचे आक्रमण

पुणे येथील एका पोलीस कर्मचार्‍याच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपीला कह्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचे उत्तरप्रदेशात पथक गेले होते. साध्या वेशात असलेल्या पोलिसांना नागरिक समजून फरासखाना पोलीस ठाण्याच्या पथकावर उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे जमावाने आक्रमण केले.

सार्वजनिक कार्यक्रम घेणार्‍या राजकीय नेत्यांवर कारवाई का होत नाही ? – मुंबई उच्च न्यायालय

राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी सर्रासपणे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करतात. नेतेमंडळी जेव्हा स्वत: नियमांचे काटेकोरपणे पालन करतील, तेव्हा जनतेला आवाहन करण्याची आणि न्यायालयाला ‘नियम पाळा’, असे सांगण्याची वेळच येणार नाही.

मंदिरांतील धन लुटणे आणि हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र ! – गंगाधर कुलकर्णी, कार्याध्यक्ष, श्रीराम सेना

मंगळुरू येथील कोरगज्जा देवस्थानाच्या दानपेटीत ३ धर्मांध युवकांनी गर्भनिरोधक टाकले. या कृत्यानंतर त्या तिघांमधील नवाज याने रक्त येईपर्यंत स्वत:चे डोके भिंतीवर आपटून घेतले. यात त्याचा मृत्यू झाला.

मंदिरांवरील आक्रमणास मूर्तीपूजेला विरोध आणि जिहादी विचारसरणी कारणीभूत ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

मूर्तीपूजेला विरोध आणि जिहादी विचारसरणी यांमुळे मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. महंमद बिन कासीम याने पहिल्यांदा मंदिरावर आक्रमण केले. त्या वेळेपासून मंदिरांवर जिहादी आक्रमणे होत आहे.