मुंबई – गेल्या वर्षी दळणवळण बंदीच्या काळात राज्य सरकारच्या कोरोना हाताळण्याच्या धोरणाविषयी नवी मुंबईतील सुनैना होले या महिलेने टीका केली होती. या प्रकरणी महिलेवर मुंबईच्या सायबर विभागाने नोंद केलेला केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने ५ मे या दिवशी रहित केला. ‘महिलेच्या ट्वीटमध्ये दोन धर्म वा समुदाय यांच्यात तेढ करणारे भाष्य केलेले नाही’, असेही न्यायालयाने गुन्हा रहित करतांना म्हटले. न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे आणि न्यायमूर्ती एम्.एस्. कर्णिक यांच्या खंडपिठाने हा निर्णय घेतला.