अमरावती येथे क्षुल्लक वादातून हिंदु तरुणाची हत्या !

जर या घटनेत मुसलमानाची हत्या झाली असती, तर देशात निधर्मींनी आतापर्यंत असहिष्णूतेच्या आरोळ्या ठोकल्या असत्या ! हे असेच चालू राहिले, तर महाराष्ट्राचे बंगाल होण्यास वेळ लागणार नाही.

 ‘स्टॅलिन’रूपी संकट !

‘तमिळनाडूवर अण्णाद्रमुकने राज्य करावे कि द्रमुकने ?’ असा प्रश्न निरर्थक आहे; कारण या राज्यात राष्ट्रवाद किंवा हिंदुत्व या सूत्रांना काहीच किंमत दिली जात नाही. तमिळनाडूमध्ये आतापर्यंतच्या राजकारण्यांनी ‘आमची वेगळी तमिळी संस्कृती’, असे जनतेच्या मनावर बिंबवले.

घरगडी कि पोलीस ?

भारतातील पोलिसांना ‘कर्तव्यचुकार’, ‘हिंदुद्रोही’, ‘भ्रष्ट’ आदी विविध विशेषणे लावली जातात. त्यांच्याविषयी सहानुभूती वाटण्याचे प्रसंग तसे थोडेच. विविध समस्यांनी आणि दुर्गुणांनी ग्रस्त असणार्‍या पोलीसदलाच्या काही समस्याही आहेत. त्याविषयी अधूनमधून बोलले जाते.

चैत्र आणि वैशाख या मासांतील (९.५.२०२१ ते १५.५.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

हिंदु धर्मानुसार ‘प्लव’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, वसंत ऋतू, चैत्र मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे. १२.५.२०२१ पासून वैशाख मास आणि शुक्ल पक्ष चालू होणार आहे.

आधुनिक वैद्यांची अपकीर्ती केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील पालविरुद्ध गुन्हा नोंद !

कोरोनाच्या संकटकाळात साहाय्य करणे तर दूरच, उलट अशी विधाने करणार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे !

अमरावती येथे मद्याच्या नशेत असलेल्या महिला कर्मचार्‍याने पोलिसांशी घातली हुज्जत !

महिला कर्मचार्‍याने दारू पिणे आणि त्या नशेत अयोग्य कृती करणे हे नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे उदाहरण !

पू. ईश्‍वरबुवा रामदासी तथा ईश्‍वर महादेव पाटोळे यांची पोलीस संरक्षण मिळण्याची निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे मागणी

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २७ आणि २८ एप्रिल या दिवशी संपत याने मला ‘इथून पुढे इथे राहिलात, इथे दिसलात, तर तुमच्यावर विनयभंग, बलात्कार प्रयत्नाचा खोटा गुन्हा नोंद करून तुम्हाला आयुष्यभरासाठी कारागृहात घालवीन’, अशी धमकी दिली.

कोरोना रुग्णांची वाढ होणार्‍या ठिकाणी दळणवळण बंदी करा !

पुण्यासह ज्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत आहे, अशा ठिकाणी दळणवळण बंदी लागू करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. ‘आम्हाला आदेश द्यायला लावू नका’, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले आहे.

महाराष्ट्रात दहा लाखांहून अधिक तरुण कोरोनाग्रस्त !

राज्यामध्ये ३१ ते ४० या वयोगटातील १० लाख ५१ सहस्र ५९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. ४१ ते ५० या वयोगटातील १८.१३ टक्के व्यक्ती कोरोनाबाधित आहेत.

डोहाळे : सात्त्विक आणि असात्त्विक !   

आपण जे पदार्थ ग्रहण करतो, त्याचा आपले शरीर आणि मन यांच्यावर स्थूल अन् सूक्ष्म अशा दोन्ही माध्यमांतून परिणाम होत असतो, हे अन्नशास्त्र आहे. त्यामुळे पिझ्झा आणि बर्गर, तसेच चायनीज पदार्थ यांचा मानवावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे याचा गर्भवती महिलांनी विचार करायला हवा.