कोरोनाच्या संकटकाळात साहाय्य करणे तर दूरच, उलट अशी विधाने करणार्यांना कारागृहातच डांबायला हवे !
मुंबई – आधुनिक वैद्यांची अपकीर्ती केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील पालविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सुनील यांनी ‘आधुनिक वैद्य सैतानाच्या वेशात फिरत आहेत, कोरोनाच्या नावाने आधुनिक वैद्यांकडून गरिबांना घाबरवले जात आहे. रुग्णालयात बेड, प्लाझ्मा आणि औषधे नाहीत’, असे सांगून त्यांचे मानसिक शोषण केले जात आहे. गरीब रुग्णांचा सायंकाळपर्यंत मृत्यू होईल, याची पुरेपुर काळजी घेतली जात आहे’, असे वक्तव्य केले होते.