अमरावती येथे क्षुल्लक वादातून हिंदु तरुणाची हत्या !

  • ‘अशा घटनांमध्ये देशात असहिष्णुता आहे’, असे म्हणणारी टोळी मूग गिळून गप्प बसते.

  • जर या घटनेत मुसलमानाची हत्या झाली असती, तर देशात निधर्मींनी आतापर्यंत असहिष्णूतेच्या आरोळ्या ठोकल्या असत्या !

  • हे असेच चालू राहिले, तर महाराष्ट्राचे बंगाल होण्यास वेळ लागणार नाही.

परतवाडा (अमरावती) – छोटा बाजार परिसरात ३ मे या दिवशी दुपारी ४ वाजता नगरपालिका सफाई कर्मचारी विकी देविदास पवार याच्यावर चाकूने वार करून धर्मांध शेख मुराद शेख इस्माईल याने त्याची हत्या केली. (‘हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे’, असे हिंदूंना वाटते, ते यासाठीच ! – संपादक)

रस्त्यावरून जातांना विरुद्ध दिशेने येणार्‍या विकी पवार याच्या दुचाकीचा चुकून इस्माईल याला धक्का लागला. त्याने विकी याला त्याविषयी विचारले. त्या वेळी विकीने स्वतःजवळील चाकूने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला; मात्र इस्माईलने त्याच्याकडील चाकू हिसकावून घेत विकीवर वार केला. यात विकी पवार याचा मृत्यू झाला, असे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. (या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार कुणी होते का ? हे पहावे. हिंदू शस्त्र बाळगतात, असे सहसा होत नाही. क्षुल्लक कारणावरून धर्मांधच थेट हिंदूंच्या हत्या करतात, हेच यावरून सिद्ध होते. हिंदु-मुसलमानांच्या कित्येक प्रकरणांत कांगावखोर धर्मांधांमुळे उलट तक्रारी प्रविष्ट केल्या जातात. याही प्रकरणात तसे झाले नसेल कशावरून ? – संपादक) धर्मांध इस्माईलला पोलिसांनी अटक केली.