महाराष्ट्रात दहा लाखांहून अधिक तरुण कोरोनाग्रस्त !

 

मुंबई – राज्यामध्ये ३१ ते ४० या वयोगटातील १० लाख ५१ सहस्र ५९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. ४१ ते ५० या वयोगटातील १८.१३ टक्के व्यक्ती कोरोनाबाधित आहेत. राज्याच्या मृत्यूदर समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी ‘तरुणांमध्ये संसर्गाच्या प्रमाणात वाढ असली, तरी भरती होणार्‍या रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण अधिक नाही’, असे सांगितले.

यापूर्वी २१ ते ३० या वयोगटामध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक नव्हते; मात्र आता त्यातही वाढ झाली आहे. या वयोगटातील ८ लाख ३६ सहस्र ७६५ जण कोरोनाबाधित आहेत. राज्यात स्त्रियांमध्ये संसर्गाचे प्रमाण ४० टक्के, तर पुरुषांमध्ये ६० टक्के आहे. ५१ ते ६० वयोगटामध्ये रुग्णांचे प्रमाण हे १५.०९ टक्के इतके, ६१ ते ७० या वयोगटात हे प्रमाण १०.३६ इतके आहे. मुंबईत ३० ते ३९ या वयोगटामध्ये १ लाख २५ सहस्र ९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.