संभाजीनगर खंडपिठाकडून कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांना नोटीस

महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण. सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी अधिवक्ता जितेंद्र पाटील आणि नेहा कांबळे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे

जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे निवडणूक माहिती कक्षनिहाय (बुथ) चालू करावेत ! – चिन्मय कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते 

सातारा जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. जिल्ह्यात रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे.

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या तिघांना अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे अटक 

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या सुग्रीव किर्दकर, अजय जाधव आणि कुमार जाधव यांना अकलूज पोलिसांनी सापळा रचून अटक केली. हे सर्व ३५ सहस्र रुपयांना रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीचा प्रयत्न करत होते.

अन्वेषणासाठी सहकार्य केल्यास रश्मी शुक्ला यांना अटक करणार नाही !

‘फोन टॅपिंग’ प्रकरणात रश्मी शुक्ला अन्वेषणासाठी सहकार्य करणार असतील, तर त्यांना अटक करणार नाही, अशी शाश्‍वती महाराष्ट्र शासनाकडून मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.

राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करून भाजपकडून बंगालमधील हिंसाचाराचा निषेध !

बंगालमधील निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार घडवून आणला. भाजपच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करून हिंसाचाराचा निषेध करण्यात आला.

अमरावती येथे क्रिकेट खेळणार्‍या तरुणांच्या १७ दुचाकी जप्त !

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक नियम घालून दिले आहेत; मात्र येथील दस्तूर नगर, सिंधी कॅम्प येथील समाज मंदिराच्या पटांगणात एकाच वेळी ५० हून अधिक तरुण क्रिकेट खेळत असतांना आढळले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत विनामास्क फिरणार्‍यांकडून २१ लाख रुपयांचा दंड वसूल !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत विनामास्क फिरणार्‍या ४ सहस्र ३४२ जणांवर एप्रिल मासात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २१ लाख ७१ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

खासदार सुजय विखे-पाटील यांच्या विरोधातील याचिका निकाली !

नगर येथील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी १० सहस्र रेमडेसिविर इंजेक्शन विमानातून आणल्याप्रकरणी येथील खंडपिठात प्रविष्ट केलेली याचिका न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. देबडवार यांनी ५ मे या दिवशी निकाली काढली.

विशाळगडावरील अतिक्रमणांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या निवेदनाची शासनाकडून नोंद

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून, दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन निपाणी येथील हिंदुत्वनिष्ठ अभिनंदन भोसले यांनी ई-मेलद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारतीय पुरातत्व खाते यांच्याकडे पाठवले आहे.

प्रसिद्ध कुस्तीपटू सुशील कुमार याच्यावर हत्येचा आरोप

ऑलंपिकमध्ये पदक मिळवणारा भारताचा कुस्तीपटू सुशील कुमार हा हत्येच्या प्रकरणी पसार झाल्याने देहली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सुशील कुमार याच्या घरावर धाडही टाकली होती.